अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » ९ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश

९ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश

९ जुलै रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई शाळा बंद आंदोलनाबाबत शिक्षण संचालकांचे स्पष्ट निर्देश

मुंबई: ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. तसेच आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले असून ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अध्यापन नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket