अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » महाबळेश्वर: वेण्णा तलाव काठोकाठ भरल्याने उत्साहात साजरी झाली ‘वेण्णा माईची ओटी’

महाबळेश्वर: वेण्णा तलाव काठोकाठ भरल्याने उत्साहात साजरी झाली ‘वेण्णा माईची ओटी’

महाबळेश्वर: वेण्णा तलाव काठोकाठ भरल्याने उत्साहात साजरी झाली ‘वेण्णा माईची ओटी’

महाबळेश्वर:महाबळेश्वर शहराची तहान भागवणारा आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला प्रसिद्ध ‘वेण्णा तलाव’ मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या या भरघोस जलसाठ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाबळेश्वरकर दरवर्षी परंपरेनुसार ‘वेण्णा माईची ओटी’ भरण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करतात. याही वर्षी हा कार्यक्रम तितक्याच भक्तिभावाने पार पडला.

वेण्णा माईचे पूजन आणि कृतज्ञता

स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक वेण्णा तलावाला ‘माते’चा दर्जा देतात. वरुण राजाची कृपा कायम राहो आणि पर्यटन हंगाम सुफल संपन्न होवो, या भावनेतून वेण्णा माईची विधीवत पूजा केली जाते. पुरोहितांच्या मंत्रोच्चारांच्या गजरात तलावाच्या काठावर वेण्णा माईला साडी, खण आणि नारळ अर्पण करून ओटी भरण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, ॲडव्होकेट संजय जंगम, रोहित ढेबे, अफजल भाई सुतार, विमलताई पार्टे, संगिता ताई वाडकर, आबा शिंदे, रवींद्रजी कुंभारदरे, तसेच महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्य लिपीक बबन जाधव,वृक्ष अधिकारी हिरवे आणि वेण्णा लेक बोट क्लबचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket