Home » राज्य » शेत शिवार » सततच्या पावसाने मोरणा धरण तुडुंब; नदीकाठच्या नागरिकांना इशारा!

सततच्या पावसाने मोरणा धरण तुडुंब; नदीकाठच्या नागरिकांना इशारा!

सततच्या पावसाने मोरणा धरण तुडुंब; नदीकाठच्या नागरिकांना इशारा!

मोरणा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून. मोरणा धरणाची पाणी पातळी 655.45 मी. इतकी झाली असून सांडवा पातळी पर्यंत पोहोचली आहे. धरणात 62.01% इतका पाणीसाठा झाला आहे. 

जलाशय परिचालन सूचिनुसार पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. सांडव्यावरून 30 cusecs इतका विसर्ग सुरू झाला आहे.तसेच सिंचन / विद्युत विमोचकामधून १२० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. एकुण १५० क्युसेक्स विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.   

पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास सांडव्यावरुन विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.मोरणा नदीच्या पात्राजवळील सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.कोणीही नदी पात्रात उतरू नये.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket