अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाय . सी. कॉलेज व ड्रीम फाऊंडेशन सातारा यांचा मिशन फॉर रिव्हर प्रकल्प साताऱ्यातील कृष्णा नदी प्रदूषणाची धक्कादायक स्थिती

वाय . सी. कॉलेज व ड्रीम फाऊंडेशन सातारा यांचा मिशन फॉर रिव्हर प्रकल्प साताऱ्यातील कृष्णा नदी प्रदूषणाची धक्कादायक स्थिती

वाय . सी. कॉलेज व ड्रीम फाऊंडेशन सातारा यांचा मिशन फॉर रिव्हर प्रकल्प साताऱ्यातील कृष्णा नदी प्रदूषणाची धक्कादायक स्थिती

सातारा तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या संगम माहुली येथे वेण्णा व कृष्णा नदीच्या संगम परिसरात नदीप्रदूषणाची गंभीर स्थिती निदर्शनास आली आहे. कृष्णा नदीच्या या बदललेल्या पाणी समस्येबद्दल यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा व ड्रीम फाउंडेशन सातारा यांच्या प्रकल्प पथकाने ‘मिशन फॉर रिव्हर’ या नदी संवर्धन उपक्रमांतर्गत संगम परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित केले, या नमुन्यांची प्रयोगशाळेत pH, विरघळलेला प्राणवायू (DO), Blue green algae चा प्रादुर्भाव, जैविक ऑक्सिजन मागणी (BOD), रासायनिक ऑक्सिजन मागणी (COD), नायट्रेट, फॉस्फेट तसेच कोलिफॉर्म जीवाणू या घटकांसाठी तपासणी करण्यात आली. वरील सर्व घटकांमुळे पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास व हिरवा रंग आल्यामुळे पाणी पिण्यास अतिशय अयोग्य आहे. 

प्राथमिक निरीक्षणानुसार नदीतील हिरवट रंग व शेवाळाची वाढ ही नायट्रेट आणि फॉस्फेटच्या वाढलेल्या प्रमाणामुळे असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ही पोषकद्रव्ये प्रामुख्याने शेतीमधून वाहून येणारी रासायनिक खते, सांडपाणी, घरगुती सांडपाणी, डिटर्जंटयुक्त पाणी तसेच नदीत सोडला जाणारा कचरा यांमधून नदीत पोहोचत असल्याचा संशय आहे. सदरचा अहवाल वाय . सी. कॉलेज व ड्रीम फाऊंडेशन च्या पथकाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड (MPCB) सातारा या ऑफिसमध्ये उपप्रादेशिक अधिकारी श्री अमोल सातपुते साहेब यांच्याकडे सादर केला व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यांच्या मते या प्रश्नावर शासकीय पातळीवर योग्य ती कारवाई केली जाईलच परंतु या प्रश्ना संबंधी लोकांचा सहभाग ही अत्यंत महत्त्वाचा आहे. ड्रीम फाउंडेशन ही संस्था सातारा जिल्ह्यातील 20 महाविद्यालया बरोबर सामंजस्य करार करून परिसरातील नद्यांचे सर्वेक्षण तसेच प्रदूषण याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने काम करत आहे.

नदीकिनारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन, धार्मिक साहित्य आणि इतर घनकचरा विखुरलेला आढळला. यामुळे नदीचे नैसर्गिक सौंदर्य तर बाधित होत आहेच, शिवाय जलचर जीवसृष्टीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, पर्यावरण विभाग तसेच नागरिकांनी नदी स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया, प्लास्टिकमुक्त परिसर आणि जनजागृतीसाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. या नदी प्रदूषणावर परिणामकारक उपाय केल्याशिवाय नद्या स्वच्छ राहणार नाहीत ,यामध्ये प्रामुख्याने नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था लावणे, नदीच्या बाजूला गर्दीच्या ठिकाणी कंपाऊंड करणे नदी परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही किंवा स्पेशल व्यक्तींची नेमणूक करणे . नदीच्या परिसरात प्रदूषण होणार नाही यासंबंधी सविस्तर सूचना फलक लावणे जेणेकरून नदीचे प्रदूषण होणार नाही.

सदरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताराचे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे, ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. एच. व्ही.देशमुख, पर्यावरण तज्ञ डॉ. रुस्तुम तांबोळी तसेच प्रकल्पात काम करणारे प्राणीशास्त्र विभागातील प्रा. सुनिल सुर्यवंशी , जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. नलवडे आणि विद्यार्थिनी कु. नम्रता अडसूळे, कु. रूहामा पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket