अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डाॕ पी. कुलकर्णी सरचिटणीसपदी डाॕ नितीन कदम यांची निवड

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डाॕ पी. कुलकर्णी सरचिटणीसपदी डाॕ नितीन कदम यांची निवड

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डाॕ पी. कुलकर्णी सरचिटणीसपदी डाॕ नितीन कदम यांची निवड

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय निवडणूकीमध्ये डाॕ प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची २९ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी बहुमताने निवड केली.

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही महाराष्ट्रातील कोचिंगक्लासेस संचालकांची सर्वांत जुनी आणि शिखर संघटना आहे. २००० साली स्थापन झालेल्या या संघटनेचे महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यामध्ये काही हजारो क्लास संचालक सभासद आहेत. डाॕ. पी. कुलकर्णी हे देखील या संघटनेचे एक संस्थापक आहेत.

डाॕ. पी. कुलकर्णी यांचेबरोबरच डाॕ नितीन कदम सर(वाई – सातारा) यांचीदेखील सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. तसेच श्री. विकास कदम (लातूर) श्री. प्रल्हाद दौंड (पुणे) श्री. भैय्यासाहेब मगर (अंमळनेर-जळगांव) आणि श्री. योगीराज आरसोड (यवतमाळ) यांची कार्याध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली. तसेच श्री विनायक परिचारक (पंढरपूर-सोलापूर) श्री. रविंद्र दारव्हटकर (चंद्रपूर) श्री. आर. सी. राजूरकर (नांदेड) आणि श्री. अशोकराव पाटील (नंदूरबार) यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. तर श्री प्रविण केंदळे (अमरावती) यांची महाराष्ट्र राज्याचे संघटक/समन्वयक आणि डाॕ आनंद मुळे (तुळजापूर-धाराशिव) यांची अंतर्गत लेखापरीक्षक पदी निवड करण्यात आली. श्री. राहूल पाटील (सांगली), श्री. दिलीपराव घुंबरे (परभणी), श्री. अजय पहाडे (वर्धा), आणि श्री संदीप ठाकरे (मालेगांव-नाशिक), श्री दत्ता केसरकर (कणकवली-सिंधुदुर्ग) यांची विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुख्य सलागारपदी श्री हनुमंतराव भोसले (केज – बीड) यांची आणि २००० साली संघटना स्थापना झाल्यापासूनचे माजी अध्यक्ष श्री. प्रविणसिंह ठाकूर (पुणे), श्री. सुभाष देसाई (कोल्हापूर), श्री. शिवाजीराव कांडेकर (नाशिक), श्री. उमाकांत कोंडापुरे (सोलापूर), डाॕ रविंद्र फडके (सांगली) श्री. आर. बी. जाधव (नांदेड) श्री. विजयराव पवार (बीड) श्रि. प्रशांत कासार (कोल्हापूर) या सर्व माजी अध्यक्षांची सलागारपदी निवड जाहीर करण्यात आली.

सध्या कोचिंग क्लासेस क्षेत्राचा चेहरा अमुलाग्र बदलला आहे. पारंपारिक पध्दतीने चालणारे एक शिक्षकी आणि एक विषयाचे क्लासेस हे खूप अडचणीत आलेले आहेत. त्यांच्यापुढे शाळा महाविद्यालयामध्ये शिकवणारे परंतू बेकायदेशीरपणे क्लासेस घेणारे दुहेरी शिक्षक, टाय-अप, इंटीग्रेटेड, कार्पोरेट क्लासेस, टेक्नाॕलाॕजीच्या आधारे डिजीटल प्लॕटफाॕर्मवरुन चालणारे क्लासेस यांचे प्रचंड आव्हान आहे.

जवळपास ६०,०००/- कोटींचा वार्षिक उलाढाल असणारा कोचिंग क्लासेस हा व्यवसाय भारतातील लाखो आणि महाराष्ट्रातील हजारो उच्चशिक्षित तरुणांना आणि तरुणींना, महिलांना आपल्या पायावर उभा करतो. परंतू शासनाने, देशाच्या आणि समाजाच्या विकासात आणि या व्यवसायाचे अर्थव्यवस्थेमध्ये काही हजारो कोटींचे कर रुपाने दिले जाणारे योगदान लक्षात घेऊन कोचिंग क्लासेस व्यवासायाला संघटीत रुप देण्याच्या दृष्टीने कधीही लक्ष दिले नाही. कोचिंग क्लासेससाठी कोणत्याच प्रकारचा कायदा आस्तित्वात नसल्याने या व्यवसायात काम करणाऱ्या कोणालाच कोणत्याही शासकीय वा बँकींग वा अन्य क्षेत्रातील योजनांचा लाभ मिळत नाही. या क्षेत्रात काम करणारे हजारो उच्चशिक्षित तरुण, तरुणी, मध्यम वयातील महिला, पुरुष शासनाच्या सहकार्याच्या प्रतिक्षेत आहेत.

सध्या कोचिंग क्लासेस क्षेत्र हे अडचणीत असलेले क्षेत्र आहे. संघटनेचे नूतन अध्यक्ष डाॕ पी कुलकर्णी हे अनुभवी क्लास संचालक, माजी प्राचार्य, विद्यापीठाचे माजी सल्लागार, डिजीटल प्लॕटफाॕर्म असलेल्या स्टार्टअप एज्युकेशनल कंपनीचे चेअरमन असा प्रदीर्घ अनुभव आसलेले व्यक्ती आहेत. आपल्या अनुभवाच्या जोरावर डाॕ पी. कुलकर्णी आणि तिकेच ताकतीचे असणारे त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी हे या क्षेत्राची प्रतिमा संवर्धनाचे काम नक्की यशस्वीपणे करतील आणि अडचणीत असलेल्या कोचिंग क्लासेस क्षेत्राला नवीन दिशा देतील असा विश्वास महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस संचालकांना वाटतो. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील हजारो क्लास संचालकांना न्याय देण्याचे आणि त्यांचा आवाज बनण्याचे काम येत्या काळात संघटनेचे नवीन अध्यक्ष डाॕ पी. कुलकर्णी, सरचिटणीस डाॕ नितीन कदम आणि सर्व पदाधिकारी यांना करावे लागणार आहे. निवडणूकीमध्ये झालेल्या विजयाबद्दल अध्यक्ष डाॕ पी कुलकर्णी आणि सर्व पदाधिकारी यांचे महाराष्ट्रात सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.

या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा कार्यक्रम डाॕ रविंद्र फडके (सांगली) आणि डाॕ रवीकांत शितोळे (धाराशिव) या दोघांच्या निवडणूक समितिने यशस्वीपणे पार पाडला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket