थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा
Home » राज्य » महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती

महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती

महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती

पांचगणी प्रतिनिधी (प्रवीण घाडगे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी युवा नेते राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून ब्लॉक अध्यक्ष नियुक्तीबाबत प्रदेश कार्यालयाकडे शिफारशी सादर केल्या होत्या. त्या शिफारशींचा विचार करून तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार राज्यभर ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या नियुक्तीनुसार महाबळेश्वर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांचे नेतृत्व आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

राजेंद्र भंडारी यांच्या नियुक्तीचे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर तालुक्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची सर्वतोपरी काळजी घेणार– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

माण खटाव बरोबर राज्यातील दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे थांबलेल्या पाणी पुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करणार पशुधनाची

Live Cricket