साताऱ्यात ३ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
सातारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, वर्ये, ता. जि. सातारा येथे होणार आहे.
मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, अभियांत्रिकी, एमबीए, बी.एस्सी. तसेच कुशल व अर्धकुशल कामगारांसाठी ४०० हून अधिक रिक्त पदांची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी विविध नामांकित कंपन्यांनी ऑनलाईन अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह दि. ३ जुलै रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अमिता मु. पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ०२१६२-२३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.




