अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

फलटण तालुक्यात पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण योजनेचा शुभारंभ

सातारा, दि.25: पशुसंवर्धन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सातारा यांच्या सेस फंडातून व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या सहयोगाने ‘पशुपालकांच्या दारात भ्रूण प्रत्यारोपण द्वारे गर्भधारणा’ हा एक नाविण्यपूर्ण व महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. २५ जून २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उत्साहात करण्यात आली.

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पशुपालकांना उच्च वंशावळीच्या भ्रूणाद्वारे निश्चित गर्भधारणा (करण्यासाठी जिल्हा परिषद सातारा मार्फत तब्बल ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना व पशुपालकांना अत्यंत कमी खर्चात आपल्या गोठ्यात उच्च दर्जाची व अधिक दूध देणारी जनावरे तयार करता येणार आहेत.

संपूर्ण प्रकल्प ‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ’ (एमएलडीबी), नागपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, ताथवडे (पुणे)’ यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. या योजनेच्या पहिल्याच दिवशी फलटण तालुक्यात तांत्रिक पथकाच्या देखरेखीखाली एकूण १२ गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्थानिक जनावरांच्या दुग्धोत्पादनात व वंशावळीत मोठी सुधारणा होणार आहे. फलटण येथील सदर उपक्रमाच्या शुभारंभासाठी राज्य समन्वयक अधिकारी, भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळा,डॉ. विष्णू जवणे यांच्या समवेत लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, फलटण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket