अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टच्या शुल्कात वाढ

दिल्ली- केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नवीन पासपोर्टसाठी २ हजार ५०० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे, तर तत्काळ पासपोर्टसाठी ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

केंद्र सरकारने जवळपास १४ वर्षांत पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. त्यानुसार, १ जुलैपासून सामान्य पासपोर्टसाठी २ हजार ५०० रुपये आणि तत्काळ योजनेअंतर्गत पासपोर्टसाठी ५ हजार रुपये शुल्क लागणार आहे.

केंद्र सरकारने पासपोर्टच्या शुल्कात जारी केलेल्या सुधारित शुल्क रचनेनुसार, आता १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या अर्जदारांसाठी ३६ पानांचा नवीन पासपोर्ट किंवा त्याचं नूतनीकरण सामान्य योजनेअंतर्गत २ हजार ५०० रुपयांचं शुल्क आकारलं जाईल. जे सध्या १ हजार ५०० रुपये आकारले जात होते. तसेच तत्काळ सेवेचं शुल्क ३ हजार ५०० रुपयांवरून आता थेट ५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

या बरोबरच ६० पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीतील शुल्क २ हजार रुपयांवरून आता थेट ३ हजार ५०० रुपये आणि तत्काळ श्रेणीतील शुल्क ४ हजार रुपयांवरून थेट ६ हजार रुपये करण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सुधारणा नियम २०२६ द्वारे अधिसूचित केलेली ही सुधारित शुल्क रचना २०१२ च्या नंतरची पहिलीच मोठी दरवाढ असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. २०१२ मध्ये पासपोर्टच्या शुल्कात शेवटची वाढ करण्यात आली होती.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, सुधारित शुल्क रचना १ जुलै रोजी किंवा त्यानंतर सादर केलेल्या सर्व पासपोर्टसाठीच्या अर्जांना लागू होईल. पासपोर्ट कायदा १९६७ च्या कलम २४ अन्वये २० जून रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे विविध प्रवास दस्तऐवज आणि पासपोर्ट संबंधित सेवांच्या शुल्कातही सुधारणा करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket