अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिवभोजन बंद केंद्रे लवकरच सुरू करणार – मंत्री छगन भुजबळ

शिवभोजन बंद केंद्रे लवकरच सुरू करणार – मंत्री छगन भुजबळ

शिवभोजन बंद केंद्रे लवकरच सुरू करणार – मंत्री छगन भुजबळ

मुंबई- शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले असून राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे; तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरगुती गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना पुरवठा केला जात आहे. राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे; तसेच लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket