अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वायसीआयएस’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

वायसीआयएस’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

वायसीआयएस’ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

सातारा (प्रतिनिधी ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार (ता. २१) रोजी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः’ या विश्वकल्याणकारी प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते. यावेळी त्यांनी योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, उपप्राचार्य डॉ. डी. डी. नामदास, सहायक पर्यवेक्षक निर्मल पाटील, प्रा. रवींद्र खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

दरम्यान प्रसिद्ध योग प्रशिक्षिक अनुराधा इंगळे यांनी उपस्थितांना योगासनांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन आणि भुजंगासन यांसह विविध आसनांची शास्त्रीय पद्धत आणि त्यांचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी अतिशय उत्साहात सामूहिक योगासने आणि प्राणायाम केला. अनुराधा इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या युगात नियमित योगाभ्यास हाच निरोगी राहण्याचा एकमेव मार्ग आहे. योग केवळ शारीरिक तंदुरुस्ती देत नाही, तर ती मानसिक शांतता आणि बौद्धिक स्थिरता मिळवून देणारी गुरुकिल्ली आहे. केवळ एक दिवस नव्हे, तर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा. तरच आपण एक समृद्ध आणि निरोगी समाज निर्माण करू शकू.”

जिमखाना विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. जिमखाना विभागप्रमुख डॉ. उदय शिंदे, आकाशी पाटील, प्रा. प्रथमेश भोसले, प्रा. तुषार डहाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. प्रा. इंद्रजित मोरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा शिक्षक अमोल जमदाडे यांनी आभार मानले.

    शेवटी सर्वांनी ‘करो योग, रहो निरोग’ ही ऊर्जेने भरलेली घोषणा दिली आणि योगिक क्रियांची सांगता झाली. ‘स्वस्थ वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, ज्युनिअर कॉलेज विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket