अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे – डॉ मनोहर ससाणे

सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे – डॉ मनोहर ससाणे

सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसायांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी आहे – डॉ मनोहर ससाणे

सातारा : रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (RHOAS), जिल्हा सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कंटिन्यूअस मेडिकल एज्युकेशन (CME) कार्यक्रम हॉटेल लेक व्ह्यू येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील शेकडो डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील अपोलो हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनप्रकाश हॉस्पिटल, पाचवडचे संचालक व RHOAS चे अध्यक्ष डॉ. मनोहर ससाणे होते.CME कार्यक्रमामध्ये अपोलो हॉस्पिटल, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी खालील विषयांवर मार्गदर्शन केले –

• डॉ. विशाल कोळे – “NICU on the Move” : नवजात शिशु अतिदक्षता विभागातील अद्ययावत उपचारपद्धती व व्यवस्थापन.

• डॉ. स्मृती हिंदारिया (पिसाळ) – “MICAS & Robotic Cardiac Surgery” : हृदयविकार शस्त्रक्रियेमधील आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान व त्याचे फायदे.

• डॉ. निशित शाह – “Why Robotic Joint Replacement” : रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेची अचूकता, फायदे व रुग्णांना होणारे लाभ.

अध्यक्षीय भाषणात डॉ. मनोहर ससाणे यांनी सांगितले की, “सन २००८ मध्ये स्थापन झालेली RHOAS ही संघटना सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. फायर रजिस्ट्रेशन, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, दवाखान्यांचे विविध परवाने व नोंदणी, डॉक्टरांवर होणारे विनाकारण आरोप, ब्लॅकमेलिंग, हल्ले तसेच प्रशासकीय अडचणी अशा विविध प्रश्नांवर संघटना ठामपणे डॉक्टरांच्या पाठीशी उभी राहिली आहे.”

यावेळी त्यांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी पेपरलेस OPD प्रणाली, मेडिकल टुरिझम व ज्ञानवृद्धीसाठी नामांकित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भेटी, तसेच तालुकास्तरावर शाखा स्थापन करून स्थानिक डॉक्टरांच्या समस्या सोडविणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. डॉक्टरांच्या व्यावसायिक, सामाजिक व कायदेशीर हितासाठी संघटना भविष्यातही प्रभावीपणे काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर बेंद्रे, संस्थापक सचिव डॉ. माणिकराव जाधव, माजी अध्यक्ष डॉ. शंतनू पवार, उपाध्यक्ष डॉ. प्रताप गोवेकर, सचिव डॉ श्रीकांत कदम, उपसचिव डॉ. अभिजित थोरात, सहसचिव डॉ. अनुराधा दिवेकर, कोषाध्यक्ष डॉ. विश्वजीत बाबर, उपकोषाध्यक्ष डॉ. विकास फरांदे, संचालक अरविंद गावडे तसेच सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी अपोलो हॉस्पिटल, पुणे येथील जनरल मॅनेजर सौ. स्नेहल साहू, मॅनेजर श्री. राजेश पाखरे व पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर श्री. सुरज साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रुबी डायग्नोस्टिक सेंटर, साताराचे व्यवस्थापकीय संचालक श्री. स्वप्नील जंगम, श्री. सागर कारंडे, श्री. सागर काशीद, श्री. प्रमोद लोंढे व श्री. संभाजी जाधव यांनीही विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमानंतर डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारा “संगीत रजनी” हा कार्यक्रम स्वरनिमा समूहाच्या कलाकारांनी सादर केला. त्यामुळे उपस्थित डॉक्टरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उपकोषाध्यक्ष डॉ. विकास फरांदे यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, अशा प्रकारच्या CME कार्यक्रमांमुळे डॉक्टरांना अत्याधुनिक वैद्यकीय ज्ञान मिळते आणि त्याचा थेट फायदा सातारा जिल्ह्यातील रुग्ण व समाजाला होतो. त्यामुळे असे कार्यक्रम सातत्याने आयोजित होणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ वृंदा कुलकर्णी, डॉ अनुराधा दिवेकर आणि डॉ कविता टोणपे यांनी केले

एकूणच वैद्यकीय ज्ञान, संघटनात्मक बांधिलकी आणि डॉक्टरांच्या हितासाठी असलेल्या ठोस भूमिकेमुळे RHOAS चा हा CME कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket