अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » वाई-सातारा रस्त्यावर भीषण अपघात; वाई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचे जागीच निधन

वाई-सातारा रस्त्यावर भीषण अपघात; वाई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचे जागीच निधन

वाई-सातारा रस्त्यावर भीषण अपघात; वाई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचे जागीच निधन

वाई:वाई-सातारा रस्त्यावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) विभागाचे धाडसी पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचे जागीच दुर्दैवी निधन झाले, तर या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-सातारा रस्त्यावरून प्रवास करत असताना, वाकेश्वर-बावधन हद्दीत पाठीमागून आलेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, श्रावण राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या गंभीर जखमी पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्यात अत्यंत कर्तव्यदक्ष आणि धाडसी पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावला होता. त्यांच्या अशा अचानक आणि अकाली जाण्याने वाई पोलीस दलासह संपूर्ण सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket