अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

सातारा दि. 18 :- गोवा राज्यातील विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा प्रचंड साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि भरारी पथक (सातारा) यांनी सातारा-लोणंद रोडवर संयुक्त सापळा रचून तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

  सातारा-लोणंद रोडवरील तडवळे (स. वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील ‘हॉटेल रंगिला राजस्थान’ समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली होती. यावेळी संशयास्पद वाटलेल्या एका टाटा कंपनीच्या १० चाकी ट्रक कंटेनरची (क्र. NL-01-AF-3549) झडती घेतली असता, त्यात केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

 याप्रकरणी दोघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ४२५/२०२६ (दि. १७/०६/२०२६) अन्वये नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि उप अधीक्षक (मुंबई भरारी पथक) रविंद्र उगले, निरीक्षक रियाज खान व निरीक्षक विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड करत असून अमोल चिलगर यांनी फिर्याद दिली आहे.

 मुंबई भरारी पथकात दुय्यम निरीक्षक संतोष गोंदकर, रुपेश चव्हाण आणि जवान अमोल चौगुले, चंदन पंडित, बाबू देवकर, महेश कोकणे, विजय ढवळे, ओंकार हराळे तर सातारा भरारी पथकात निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, जवान नरेंद्र कलकुटगी, शंकर चव्हाण, फलटण कार्यालयातील निरीक्षक संजय दिंडे, संदीप लोहकरे, जवान विनोद हिंगणे आणि प्रियांका माळवे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

राज्य शासनाचा महसूल बुडवून होणारी अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक या संदर्भात काहीही माहिती अथवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक: १८०० ८३३ ३३३३, व्हॉटसॲप क्रमांक: ८४२२००११३३, दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२६६३८८१ क्रमांकांवर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket