कूपर कार्पोरेशन मध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा
सातारा प्रतिनिधी -कूपर कार्पोरेशन कंपनीमध्ये जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दि. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कूपर कार्पोरेशन प्रा. लि कंपनीमध्ये कंपनीचे एच आर विभागाचे सी एच आर ओ. श्री. नितीन देशपांडे, डायरेक्टर श्री रामेश जाधव, सी सी ओ असलम फरास यांच्या मार्गदर्शना खाली विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले .
यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण करण्यात आले कंपनीचे पर्यावरण अधिकारी अजित साबळे यांनी पर्यावरणसंबंधी कामगार व कर्मर्चा यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी काय खबरदारी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यकमामध्ये कामगार व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . पर्यावरण दिनानिमित्त कंपनीच्या वतीने सर्व युनिट मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी स्वप्नील नलवडे, विजय बरकडे, पोपट लोखंडे, हमिद पटेल, वैभव बर्गे, राजेंद्र बर्गे, अनिकेत रसाळ, विशाल फाळके, सागर पाटिल, अजित साबळे उपस्थित होते .




