अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वरमधील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ‘डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

महाबळेश्वरमधील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ‘डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

महाबळेश्वरमधील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ‘डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

महाबळेश्वर:महाबळेश्वर नगरपालिकेत गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन, घरकुल योजनांची अंमलबजावणी आणि सामाजिक मागण्यांसाठी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया (कामगार आघाडी) च्या वतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे यांनी दिला आहे.

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे:

१.झोपडपट्टी पुनर्वसन:१३ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार, ३० ते ३५ वर्षांपासून महाबळेश्वरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना तातडीने जागेचे उतारे वाटप करण्यात यावेत.

२.सांस्कृतिक भवनाला नाव:आराम चौक (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील सांस्कृतिक भवनाला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव देण्यात यावे.

३.मातंग समाज मंदिर: रामगड रोडवरील बालक मंदिर किंवा जुन्या कत्तलखान्याच्या जागेवर मातंग समाज मंदिर उभारून ते मंजूर करण्यात यावे.

४ घरकुल योजना: महाबळेश्वरमध्ये मंजूर होऊन आलेल्या घरकुल योजना जागेअभावी परत जात आहेत. गोरगरीब लाभार्थ्यांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून त्यांना हक्काची घरकुले मिळावीत.

५ प्रवेशद्वार-गवळी येथील वायदंडे वस्तीमध्ये दलित वस्ती सुधारणा निधीतून विकासकामे करून, त्या वस्तीच्या प्रवेशद्वाराला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार’ असे नाव देण्यात यावे.

6 आंदोलनाची पार्श्वभूमी आणि इशारा

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून याआधीही त्यांनी अनेकदा आंदोलने केली होती. या संघर्षाला यश येऊन सरकारने वंचित झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाचे आदेश दिले आहेत. मात्र, उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. जर येणाऱ्या काळात या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

यावेळी शहर महिला अध्यक्ष सायराताई शेख, शहर संघटक नुराजांहा खारखंडे, मोहन कारंडे, अख्तर मापुळे, युवा नेते विजयभाऊ गायकवाड, प्रताप देवेंद्र नायडू, पुनम ताई देवकुळे, मंगलताई वायदंडे, संपर्कप्रमुख साजिदा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket