महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
सातारा दि. 15: माहे जून 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाचे आयेाजन सोमवार दि. 15 जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, सातारा येथे करण्यात आले आहे.
जिल्हास्तर लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी जिल्हास्तरीय महिला लेाकशाही दिनाकरीता करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज संबंधितानी दोन प्रतीत करणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे.




