अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्राध्यापकांना पीएच.डी पदवी प्राप्त

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्राध्यापकांना पीएच.डी पदवी प्राप्त

यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्राध्यापकांना पीएच.डी पदवी प्राप्त

सातारा : यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील दोन प्राध्यापकांनी आपल्या संशोधन कार्याद्वारे पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन करून संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील गौरवात भर घातली आहे.

फार्मसी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. रुपाली प्रशांत भोईटे यांनी उंदरांमध्ये व सशांमध्ये मधुमेहावरील ग्लायक्लाझाईड या औषधासोबत निवडक हर्बल रसांच्या परिणामांचा अभ्यास या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनामध्ये मधुमेह उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लायक्लाझाईड या औषधासोबत विविध वनौषधी रसांच्या परस्परसंवादाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन औषधनिर्माणशास्त्र व वनौषधी उपचार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.

तसेच ग्रंथालय क्षेत्रातील प्राध्यापिका डॉ. अनुराधा विजय जगताप यांनी शैक्षणिक संस्थांमधील ग्रंथालयांचा प्रचार, वापर पद्धती आणि वापरकर्त्यांचे समाधान यांचा अभ्यास या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी संपादन केली. त्यांच्या संशोधनामध्ये शैक्षणिक ग्रंथालयांच्या वापराचे स्वरूप, प्रचार-प्रसाराच्या विविध पद्धती तसेच विद्यार्थी व संशोधकांच्या समाधानाची पातळी यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

दोन्ही प्राध्यापकांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे व उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे म्हणाले, “उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. डॉ. रुपाली भोईटे आणि डॉ. अनुराधा जगताप यांनी आपल्या दर्जेदार संशोधनाद्वारे केवळ वैयक्तिक यश मिळविले नसून यशोदा संस्थेची संशोधनपर ओळख अधिक भक्कम केली आहे. ज्ञाननिर्मिती, नवोपक्रम आणि समाजोपयोगी संशोधन यांना प्राधान्य देणारी संशोधन संस्कृती विकसित करणे हे संस्थेचे ध्येय आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांनाही संशोधन क्षेत्रात नवे आदर्श प्राप्त होतील.”

यशोदा टेक्निकल कॅम्पस ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन, नवोपक्रम आणि ज्ञाननिर्मितीला सातत्याने प्रोत्साहन देत असून प्राध्यापकांच्या अशा यशामुळे संस्थेचा शैक्षणिक लौकिक अधिक वृद्धिंगत होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket