माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरे
सातारा दि. 8: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी जुलै 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. 9 जून रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, पाटण, 16 जून रोजी तहसील कार्यालय खंडाळा, 23 जून रोजी तहसील कार्यालय, वाई, व 25 जून रोजी तहसील कार्यालय माण (दहिवडी) असा कल्याण संघटकांचा दौरा राहणार आहे.




