अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » तेलबिया अंतर्गत गोदाम बांधकाम, मिनी ऑइल मिल व कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

तेलबिया अंतर्गत गोदाम बांधकाम, मिनी ऑइल मिल व कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

तेलबिया अंतर्गत गोदाम बांधकाम, मिनी ऑइल मिल व कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा – कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया योजने मधून फ्लेक्झी घटक बाबी अंतर्गत गोदाम बांधकाम, मिनी ऑइल मिल/ एक्सपेलर फिल्टर प्रेस सह व शिवाय या बाबी साठी अर्ज मागविणेत येत आहेत. ज्या ठिकाणी गोदामाची व मिनी ऑइल मिल सोय नाही अशा परिसरात गळीत धान्य पिके घेतली जातात अशा ठिकाणी गोदाम बांधकाम व मिनी ऑइल मिल/ एक्सपेलर फिल्टर प्रेस सह व शिवाय कार्यक्रमाचा जिल्हयासाठी लक्षांक प्राप्त झाले आहे. त्यासाठी खालील बाबींसाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहे.

गोदाम :- क्षमता- २५० मे.टन अनुदान गोदाम बांधकाम करण्यासाठी रु. २८.८०२५० लाख (प्रति टन रु. ११५२१/-) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा रु. १४.४० लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँककर्जाशी निगडीत असून इच्छूक अर्जदाराने (सरकारी/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी/FPOS आणि सहकारी संस्था) केंद्र शासनाच्या SMART/ वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेनेकर्ज मंजुर केल्यानंतर संबंधित अर्जदार सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि. ३० जुलै अखरे सादर करावयाचे आहे.

 मिनी ऑइल मिल / एक्सपेलर फिल्टर प्रेस सह उच्चतम अनुदान मर्यादा रु. ४ लाख प्रती युनिट,प्रवर्गानिहाय अनुदान –

मिनी ऑइल मिल / एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवाय उच्चतम अनुदान मर्यादा रु. ३ लाख प्रती युनिट,

 अजा/अज/अल्प/सिमांत/महिला- युनिटच्या किंमतीच्या ५०% किंवा सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादत. सर्वसाधारण प्रवर्ग युनिटच्या किंमतीच्या ४०% किंवा सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादेत.अर्ज हा महाडिबीटी प्रणालीवर करण्यात यावा. तसेच या घटकासाठी प्राधान्याने FPO/FPC यांना नंतर लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.

 कडधान्य आत्मनिर्भरता अभियानातंर्गत प्रक्रिया युनिट स्थापना :- क्षमता नवीन प्रक्रिया युनिटची ३०० कि.ग्रा. प्रति तास .अनुदान – यंत्रसामुग्री, खरेदी तसेच इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी अनुदानाच्या जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या ३० % पर्यंत असेल म्हणजे प्रकल्प खर्चाच्या ३३% किंवा रक्कम रु. २५ लाख या पैकी जे कमी असेल ते. (अनुदानाची ५० % रक्कम ही यंत्रसामग्री स्थापनेनंतर व ५० % रक्कम ही युनिट यशस्वी कार्यान्वित झालेनंतर) तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधांचे देखील लक्षांक प्राप्त झाले.

वरील सर्व बाबींसाठीचे अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयामार्फत सादर करावेत. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थीनिवड करणेत येईल.आहे. तरी इच्छुकांनी अर्जदारांनी याबाबत कोणतीही अडचण आल्यास संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket