साताऱ्यात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त खुल्या योगासन स्पर्धेचे आयोजन
सातारा ( प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील ध्यास फाऊंडेशन आणि हरीॐ योगा अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून महिला व ७ जून रोजी पुरूष, भव्य व खुल्या योगासनांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा एकूण सात वयोगटात होणार आहेत.
वय वर्षे १० ते ५५ आणि पुढे या विविध वयोगटात स्पर्धा होणार आहेत. दि. ६ रोजी महिला तर दि. ७ जून रोजी पुरूषांच्या स्पर्धा पार पडतील. या स्पर्धा एकूण सात वयोगटात सकाळी ९ वाजता मराठी मिशन युनियन स्कूल, सिव्हील हॉस्पिटल रोड, सातारा येथे होणार आहेत. स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक अनिल महाडिक व वैजयंती ओतारी मॅडम यांनी केले आहे. संपर्क क्रमांक 942387723




