अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद

कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद

कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई; 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त, तिघे जेरबंद

18.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वारुंजी फाट्यावर सापळा रचून छापा कारवाई

कराड( ज्ञानेश्वर शेवाळे)कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण 18 लाख 82 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.

याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket