वाईतील समाजभूषणांचा भारत विकास परिषदेतर्फे गौरव
वाई : भारत विकास परिषद, वाई शाखेच्या वतीने वाई परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच समाजसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम गंगापुरी, वाई येथील स्वामी समर्थ मठात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सत्कारमूर्तींना ट्रॉफी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सत्कारानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजसेवेतील अनुभव, कार्याची प्रेरणा आणि भविष्यातील संकल्प यांविषयी विचार मांडले.
कार्यक्रमास भारत विकास परिषद, वाई शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती लाभली. यामध्ये सौ. ओसवाल, सौ. यादव, सौ. पोरे, श्री. अनिल देव, श्री. अविनाश जोशी, श्री. बोपर्डीकर, श्री. भरत ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.




