अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकरचे डॉ. संतोष बेल्हेकर यांचे मायग्रेन आजारावर नवसंशोधन जर्मन सरकारकडून विशेष गौरव. जागतिक नियतकारिकेत शोधनिबंध प्रसिद्ध.

गौरीशंकरचे डॉ. संतोष बेल्हेकर यांचे मायग्रेन आजारावर नवसंशोधन जर्मन सरकारकडून विशेष गौरव. जागतिक नियतकारिकेत शोधनिबंध प्रसिद्ध. 

गौरीशंकरचे डॉ. संतोष बेल्हेकर यांचे मायग्रेन आजारावर नवसंशोधन जर्मन सरकारकडून विशेष गौरव. जागतिक नियतकारिकेत शोधनिबंध प्रसिद्ध. 

लिंब-मायग्रेन (अर्धशिशी) या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च, लिंब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी अर्धशिशी या आजारावर केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित म्हणून ओळखले जाणारे स्प्रिंगर प्रकाशनचे नैनिन-श्मिडेबर्ग्स अकाईव्हज ऑफ फार्माकोलाॅजी या नामांकित जर्मन सोसायटी ऑफ एक्सपेरिमेंटल अँड क्लिनिकल फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी चे अधिकृत प्रकाशन माध्यम म्हणून कार्य करते.

नैनिन-श्मिडेबर्ग्स आर्काइव्ह्ज ऑफ फार्माकोलॉजी हे जगातील सर्वात जुने फार्माकोलॉजी (औषधनिर्माणशास्त्र) नियतकालिक आहे, ज्याची स्थापना १८७३ मध्ये झाली होती. या अधिकृत नियतकालिकेत त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्याचा इफेक्ट ३.१ आहे. डॉ. संतोष बेल्हेकर यांनी प्राप्त उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांच्या हस्ते बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, सातारा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ, नागेश अलुरकर, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. मनोज शिंदे, डॉ. सीमादेवी कदम, डॉ, वर्षा माने, व डॉ अविनाश भोसले तसेच गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च, लिंबचे विभागप्रमुख डॉ. भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे, डॉ. माधुरी मोहिते आदि प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप म्हणाले की औषध निर्माण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनातून प्राध्यापकांनी नवनिर्मितीचे स्वप्न पाहवे यामधून स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करावेत. असे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की डॉ, संतोष बेल्हेकर यांनी अथक परिश्रम घेऊन मायग्रेन या आजारावर केलेले संशोधन या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. डॉ. संतोष बेल्हेकर यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनाची सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी केले. आभार संजय देशमाने यांनी केले. 

 मायग्रेन हा जगभरातील लाखो लोकांना त्रास देणारा गंभीर आजार आहे. तीव्र डोकेदुखी मळमळ उलट्या हे प्रमुख लक्षणे यामध्ये दिसून येतात. अनेक वेळा मायग्रेनच्या झटक्यामुळे रुग्णांना गोळ्या खाणे कठीण जाते. तसेच औषधांचा परिणाम होण्यास विलंब लागतो. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून डॉ संतोष बेल्हेकर यांनी नाकावाटे थेट मेंदूपर्यंत औषध पोहोचवण्याची विशेष पद्धत विकसित केली आहे.

या संशोधनात विशेष औषध सामान्य तापमानात द्रवरूपात असते मात्र नाकात गेल्यावर शरीराच्या तापमानामुळे ते जेलमध्ये रूपांतरित होते या पद्धतीमुळे औषध थेट मेंदूपर्यंत पोहोचवण्यास मदत होते व रुग्णांना वेदनापासून आराम मिळतो.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket