अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे पुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहन

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे पुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहन 

सातारा जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्धः अफवांवर विश्वास ठेवून साठेबाजी न करण्याचे पुरवठा विभागाचे नागरिकांना आवाहन 

सातारा दि.२९ – आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेल वितरण विस्कळीत होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यात काही ठिकाणी इंधन टंचाईच्या अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा आणि विविध ऑईल कंपन्यांचे (IOCL/BPCL/HPCL) विक्री अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला.  

सातारा जिल्ह्यात एकूण ३३८ पेट्रोल पंप कार्यरत आहेत. जिल्ह्याला हवेली (पुणे), मिरज (सांगली) आणि पाकणी (सोलापूर) या तीन वेगवेगळ्या ऑईल डेपो (Oil Depots) मधून नियमित तेलाचा पुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी दररोज ६०० किलोलीटर (KL) पेट्रोल आणि १००० किलोलीटर (KL) डिझेलची (1 किलोलीटर म्हणजे 1000 लिटर) विक्री होते.

आजघडीला सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा २७७६ किलोलीटर व डीझेलचा ३६७१ किलोलिटर असा पुरेसा साठा शिल्लक आहे. तसेच ऑईल कंपन्यांकडूनही मागणीनुसार दररोज पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. इंधन पुरवठा करणारे तिन्ही डेपो सातारा जिल्ह्याच्या जवळ असल्याने पुरवठ्यात कोणताही खंड पडणार नाही असे ऑईल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket