अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

सातारा  : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अ‌द्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उ‌द्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील एकूण ३ शेतकरी राज्यस्तरावर विजेते झाले आहेत. त्यामध्ये बाजरी पिकात अशोक चंद्र नलावडे मु.पो. विरळी ता. माण यांचा राज्यात प्रथम क्रमांक, सविता मुळीक मु. पो. सासकल ता. फलटण राज्यात ‌द्वितीय क्रमांक तर भात उत्पादनात चंद्रकांत लाड मु.पो. करंजे त परळी ता. सातारा यांचा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे.  

राज्यस्तरावरील विजेते ठरल्यानंतर, उर्वरित स्पर्धकांमधून जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर विजेते शेतकरी निवडले जाणार आहेत. सर्वसाधारण आणि आदिवासी गटांकरिता स्वतंत्र विजेते घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते जाहीर करण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket