अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

१८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी; आचारसंहिता तात्काळ लागू

सातारा दि. – विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून या मतदारसंघात तात्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

 

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५ टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असते. यापूर्वी हे निकष पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक घेता आली नव्हती. मात्र आता आवश्यक निकष पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आयोगाला दिल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

तपशील

दिनांक

अधिसूचना प्रसिद्ध

२५ मे २०२६ (सोमवार),

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत

१ जून २०२६ (सोमवार),

अर्ज छाननी

२ जून २०२६ (मंगळवार),

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत

४ जून २०२६ (गुरुवार),

मतदान

१८ जून २०२६ (गुरुवार),

मतदानाची वेळ

सकाळी ८ ते सायंकाळी ४,

मतमोजणी

२२ जून २०२६ (सोमवार),

निवडणूक प्रक्रिया पूर्ण

२५ जून २०२६ (गुरुवार),

या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सांगली यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवासी उपजिल्हाधिकारी सांगली आणि सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

या मतदारसंघातील निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका व नगरपंचायतींचे अध्यक्ष तसेच सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे. एकूण ४७२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतींचे ३९६ तर जिल्हा परिषद मतदार ७६ आहेत.

मतदानासाठी सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण या उपविभाग मुख्यालयांवर एकूण सात मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक २५ मे २०२६रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक १जून २०२६ असेल. मंगळवार दिनांक २जून २०२६ रोजी अर्जांची छाननी होणार असून गुरुवार दिनांक ४ जून २०२६ पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. तर सोमवार दिनांक २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होऊन गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket