श्री. यडीयनाथ देवालय वर्धापन दिनानिमित्त गाढवलीत तीन दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळा
केळघर ,ता:२०:श्री. यडीयनाथ देवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त गाढवली पुनर्वसन येथे उद्यापासून (गुरुवार) ते शनिवार पर्यंत सलग तीन दिवसश्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळा बाळासाहेब महाराज चोपदार (आळंदी ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी सरपंच प्रकाश शिंदे यांनी दिली.
उद्या गुरुवारी गणेश महाराज डांगे यांचे कीर्तन होणार आहे.शुक्रवारी रोहिदास महाराज हांडे यांचे कीर्तन होणार आहे.शनिवारी कल्याणकर महाराज आळंदी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या पारायण सोहळ्यात पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी पाच वाजता प्रवचन त्यानंतर हरिपाठ, कीर्तन व जागर होणार आहे. तरी या पारायण सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत ,ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ, नवयुग तरुण मंडळ,यडियनाथ क्रिकेट क्लब गाढवली ,ग्रामस्थ मंडळ कुरळोशी,वारणे वस्ती यांनी केले आहे.




