एन. आय. पी. एम. साताराचे नवीन कामगार संहितावर व्याख्यान
सातारा प्रतिनिधी -राष्ट्रीय स्तरावर मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या एन आय पी एम संस्थेचे सातारा सह्याद्री चॅप्टर नुकतेच सुरू करण्यात आले. एन. आय. पी. एम. ही मानव संसाधन (एच. आर.) आणि औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून देशातील ६० पेक्षा जास्त चॅप्टर असून ११००० पेक्षा जास्त सभासद आहेत. या सकिय चॅप्टर्सच्या माध्यमातून चर्चासत्रे, कार्यशाळा व सभासदत्वाच्या संधीद्वारे या क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात.
एन. आय. पी. एम. सह्याद्री सातारा चॅप्टरचा पहिला कार्यक्रम सातारा येथील द फर्न हॉटेल येथे उत्साहात नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील मान्यवर मानव संसाधन (एच. आर.) क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमाला पुणे येथील प्रख्यात कामगार कायदा तज्ज्ञ अॅड डॉ. श्रीकांत मालेगावकर यांचे “New Labour Code Implementation” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन आयोजित केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धैर्यशील भोसले, अध्यक्ष-मास सातारा, श्री. नितीन कावले सहाय्यक कामगार आयुक्त, श्री. इरफान खान, संयुक्त संचालक-डिश सातारा उपस्थित होते.एन. आय. पी. एम सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उदय भोसले व उपाध्यक्ष श्री नितीन देशपांडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात डॉ. उदय भोसले यांनी एन आय पी एम संस्थेचे उद्दिष्ट व कार्यप्रणालीची माहिती दिली. तसेच श्री. नितीन देशपांडे यांनी सह्याद्री सातारा चॅप्टरच्या कार्याचा आढावा व भावी उपक्रमांविषयी माहिती सादर केली व सदर सह्याद्री सातारा चॅप्टर मधील महिला सभासदांचा जास्तीत जास्त सहभाग हा उल्लेखनीय आहे, याची प्रशंसा केली. तसेच जास्तीत जास्त मानव संसाधन
(एच आर )क्षेत्रातील अधिका-यांनी एन. आय. पी. एम. सह्याद्री सातारा चॅप्टरचे सभासदत्व घ्यावे, याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते अॅड. डॉ. श्रीकांत मालेगावकर यांनी उपस्थित मानव संसाधन (एच. आर.) क्षेत्रातील यांना “नवीन कामगार संहिता” या विषयावर सविस्तर प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले. या मौल्यवान मार्गदर्शनातून उपस्थित सर्व एच आर क्षेत्रातील व उद्योग प्रतिनिधींसाठी नवीन कामगार कायद्यांतील बदल, अंमलबजावणी प्रक्रिया व उद्योग क्षेत्रावरील परिणाम यांची सविस्तर माहिती अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. धैर्यशील भोसले अध्यक्ष, मास- सातारा यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करत असताना एन. आय पी एम सह्याद्री सातारा चॅप्टरचा पहिला कार्यक्रमाचे कौतुक करत पुढिल भावी उपक्रमासाठी शुभेच्छा व पाठींबा दर्शविला.
या कार्यक्रमास कूपर, विप्रो पारी, डेलवाल, अविनाश कार्गो, श्रीएचआर सर्व्हिसेस, कोपलेंन्ड, कमिन्स, निप्रो, परांजपे, सुदर्शन केमिकल्स, युमीकोअर, युपीस लॉजिस्टिक्स, वेलस्पन व सातारा जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील १५० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला कार्यक्रमास श्री. अभय खुरसाळे एन आय पी एम. नॅशनल कॉन्सिल मंबर, श्री. धैर्यशील देसाई, उद्योजक श्री राजेंद्र मोहिते, श्री संजोग मोहिते, डॉ. बी. एस. सावंत, संचालक (KBMIMSR) तसेच डॉ. भोला, डॉ निकम, डॉ. चव्हाण, VHR गुपचे संस्थापक श्री शंकर साळुंखे, विप्रोचे एच आर हेड श्री अनिल वासु, विविध उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकमाचे प्रायोजक राजवर्धन इन्फा व श्री शिवम गुपचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.



