Home » राज्य » प्रशासकीय » गौरीशंकर चे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय- अभिनेता किरण गायकवाड.

गौरीशंकर चे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय- अभिनेता किरण गायकवाड. 

गौरीशंकर चे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय.. अभिनेता किरण गायकवाड. 

डॉ. पी व्ही सुखात्मे स्कूल लिंब मध्ये मराठी अभिनेता किरण गायकवाड सह अन्य कलाकारांचा उचित सत्कार. 

लिंब- सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये गौरीशंकर संस्थेचे योगदान मोलाचे राहिले असल्याचे मत मराठी अभिनेता किरण गायकवाड यांनी व्यक्त केले.ते लिंब ता जि सातारा येथील गौरीशंकर चे डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंब येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मराठी कलाकार मिलिंद शिंदे सोनम म्हसवेकर रुक्मिणी सुतार माधव अभ्यंकर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर एमबीए महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीप्ती बर्गे स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण व शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

प्रारंभी आपल्या अभियानाने रसिका प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या अभिनेता किरण गायकवाड याचा सत्कार संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की मराठी कलाकार अत्यंत प्रतिकूलतेशी झगडत कलेची साधना करीत असतात. त्यांना प्रोत्साहन व प्रेरणेची खरी गरज आहे. विविध चित्रपट व मराठी सिरीयल मध्ये या सर्वच कलाकारांनी आपल्या कलेचे अनोखे दर्शन घडवलेले आहे त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. 

प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी केले. आभार शिक्षिका शैला शिंदे यांनी केले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket