अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सातारा येथील वि‌द्यार्थ्यांची मॉरिशसमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सातारा येथील वि‌द्यार्थ्यांची मॉरिशसमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सातारा येथील वि‌द्यार्थ्यांची मॉरिशसमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

सातारा प्रतिनिधी -सातारा येथील मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या नामांकित संस्थेतील ८ वि‌द्यार्थ्यांची मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड झालेल्या वि‌द्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत 

विनीत जाधव, विराज शेडगे, अपूर्वा खटावकर, श्रेयस आवळे, साद अन्सारी, प्रेम जाधव, सक्षम बारगे.हे सर्व विद्यार्थी अभ्यासात तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षणात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या मेहनती, जि‌द्दी आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे त्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. मॉरिशस येथे होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा मौल्यवान अनुभव मिळणार आहे.

संस्थेचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी वि‌द्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “ही निवड आमच्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. वि‌द्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले आहे.”

वि‌द्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, स्थानिक नागरिकांनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.या यशामुळे इतर वि‌द्याथ्यांमध्येही प्रेरणा निर्माण झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याची उमेद वाढली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket