अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, नोकरीमधील संधी वाढविण्यासाठी अभ्यास गट नेमणार— मंत्री शंभूराज देसाई

माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, नोकरीमधील संधी वाढविण्यासाठी अभ्यास गट नेमणार— मंत्री शंभूराज देसाई

माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, नोकरीमधील संधी वाढविण्यासाठी अभ्यास गट नेमणार— मंत्री शंभूराज देसाई

मुंबई | दि. ६ मे : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना शिक्षण, नोकरी व इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर अभ्यास गट नेमण्याचे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.माजी सैनिक, शहीद कुटुंबीय तसेच अपघातग्रस्त सैनिकांच्या विविध मागण्यांबाबत आज मेघदूत शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस महाएल्गार सैनिक एकतेचा आवाज माजी सैनिक सर्व संघटनीय सैनिक परिवार महाराष्ट्रचे कॅप्टन दाभाडे व पदाधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे गणेश पवार, माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक ओमकार कापले तसेच संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण, नोकरी व विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अर्हता प्राप्त पाल्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तात्काळ निकाली काढण्यासाठी शासन संवेदनशील व सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मान, हक्क आणि सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket