Home » ठळक बातम्या » केळघर प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात; मराठी शिक्षणाच्या महत्त्वावर भर

केळघर प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात; मराठी शिक्षणाच्या महत्त्वावर भर

केळघर प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात; मराठी शिक्षणाच्या महत्त्वावर भर”

केळघर  प्रतिनिधी :गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या रेट्यामुळे मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणारांची संख्या रोडावली आहे. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत.मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उठावदार कामगिरी केली आहे. जावळी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील केळघर प्राथमिक शाळेने शताब्दी महोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा केला असून शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही माजी सभापती बापूराव पार्टे यांनी दिली.

येथील आदर्श प्राथमिक केंद्रशाळेस नुकतीच १००वर्षे शंभर वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते .

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या कविता ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिष कदम, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,माजी उपसभापती निर्मला कासुर्डे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी मिलन मुळे, मेढ्याच्या नगरसेविका आनंदी करंजेकर,प्रा. तुकाराम ओंबळे, सरपंच ज्योत्स्ना पार्टे, उपसरपंच शंकर बेलोशे, ग्रामपंचायत सदस्य हिराबाई भिलारे, शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन बिरामणे,माजी सरपंच रवींद्र सल्लक,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा खाडे, शोभा धनावडे,दीपक गायकवाड, राहुल धनावडे , आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे,उषा उंबरकर यांच्यासह शताब्दी महोत्सव समितीचे सर्व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे म्हणाल्या, केळघर शाळा विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये नेहमीच आघाडीवर असून शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल.

पंचायत समिती सद्स्य आतिष कदम, एकनाथ ओंबळे,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ,मिलन मुळे, सुषमा थोरात, सीमा बेलोशे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पहिले माजी विद्यार्थी धोंडिबा पार्टे, गणपत मोरे,चंद्रकांत शिर्के, शंकर धनावडे, सखाराम पार्टे,दत्तात्रय पार्टे, सुमन सल्लक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शताब्दी महोत्सव निमित्त गावांतून ग्रंथदिंडी पारंपरिक लेझीमच्या ठेक्यात काढण्यात आली. संध्याकाळी दीपोत्सव व शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. शंकर जांभळे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा धनावडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

केळघर शाळेच्या शताब्दी महोत्सवासाठी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या मोबाईलवरून शुभेच्छा संदेश दिला व लवकरच शाळेला भेट देऊन शाळेच्या भौतिक सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद करणार असल्याचे सांगितले.

शाळेच्या माजी शिक्षिका सुनंदा क्षीरसागर व माजी विद्यार्थी प्रियांका किरवे यांनी शाळेला २१हजार रुपये देणगी दिली.तर माजी शिक्षिका कविता नेवसे यांनी ११हजार व सुषमा थोरात यांनी १०हजार रुपये देणगी दिली.

यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थाकडून शाळेला मानपत्र भेट देण्यात आले .या मानपत्राचे वाचन शाळेतील शिक्षिका सुचित्रा नेवसे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सद्स्य कविता ओंबळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळेसाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन दिले.शताब्दी समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket