अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई

पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई

पनीर म्हणून चीज ॲनालॉग विक्री केल्यास कठोर कारवाई

सातारा -काही हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते आपल्या आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ तयार करताना पनीर ऐवजी पनीर सदृश्य “चीज ॲनालॉग” चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पनीर व चीज ॲनालॉग हे दोन्हीही दिसायला जरी एकसारखे असले तरी ते दोन्हीही अन्न पदार्थ वेगवेगळे असून प्रत्येकाचे पोषणमूल्य हे वेगवेगळे आहे. परंतु त्याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांवर कारवाई घेण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व उत्पादकांनी त्यांच्या विक्री बिलामध्ये ते विक्री करत असलेल्या अन्न पदार्थाचा स्वयंस्पष्ट उल्लेख करावा. पनीर व चीज ॲनालॉग पदार्थांची विक्री करताना लेबलवर्णन असलेल्या पॅकबंद पाकीटातूनच करावी तसेच हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते यांनी त्यांचे आस्थापनेमध्ये वापर केल्या जाणाऱ्या पनीर अथवा चीज ॲनालॉग यांचा उल्लेख मेन्यूकार्ड व डिस्प्ले बोर्डवर करणे बंधनकारक करण्याचे निर्देश मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडून देण्यात आलेले आहेत. सर्व हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक तसेच केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते त्याचबरोबर पनीर व चीज ॲनालॉग यांचे उत्पादक यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन काटेकोरपणे न केल्यास अशावर कठोर कारवाईचे करण्यात येईल, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket