Home » Uncategorized » “विश्वास, गुणवत्ता आणि आपुलकीची सुवर्ण परंपरा” श्रीकृष्ण ज्वेलर्स, पाचगणीचे डायरेक्टर – आदरणीय तेजसदादा ओझरकर : वाढदिवस विशेष

“विश्वास, गुणवत्ता आणि आपुलकीची सुवर्ण परंपरा” श्रीकृष्ण ज्वेलर्स, पाचगणीचे डायरेक्टर – आदरणीय तेजसदादा ओझरकर : वाढदिवस विशेष

युवा उद्योजक आदरणीय तेजसदादा ओझरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

पाचगणी प्रतिनिधी -वाई–महाबळेश्वर तालुक्यातील सर्वात जुनी व विश्वासार्ह सुवर्णपेढी म्हणून ओळख असलेल्या श्रीकृष्ण ज्वेलर्स या नावाला संपूर्ण सातारा जिल्ह्यात मानाचे स्थान मिळवून देण्यात आदरणीय तेजसदादा ओझरकर यांचा मोलाचा वाटा आहे. कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट व्यावसायिक दृष्टीकोन यांच्या जोरावर त्यांनी या व्यवसायाला नवी उंची गाठून दिली आहे.

नाविन्यपूर्ण सुवर्ण अलंकार ही त्यांची खास ओळख असून, बदलत्या काळानुसार आधुनिकतेची जोड देत त्यांनी ग्राहकांच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण केल्या आहेत. सर्वसामान्य ग्राहकांशी आपुलकीने वागणे, त्यांच्या गरजा समजून तत्पर सेवा देणे आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणे—हीच त्यांची खरी ताकद आहे.

लहान असो वा थोर, प्रत्येकाशी नम्रतेने वागणारे तेजसदादा यांचे व्यक्तिमत्त्व खरोखरच प्रेरणादायी आहे. महाबळेश्वर तालुक्यात, विशेषतः पाचगणीत, अद्यावत आणि उच्च दर्जाची सुवर्ण अलंकार सेवा उपलब्ध करून देत त्यांनी ग्राहकांचा अढळ विश्वास संपादन केला आहे.

युवा उद्योजक म्हणून संयमी नेतृत्व, दूरदृष्टी आणि समाजाशी असलेली नाळ यामुळे ते अनेकांसाठी आदर्श ठरत आहेत. त्यांच्या कार्यातून उद्योजकतेसोबतच सामाजिक बांधिलकीही प्रकर्षाने दिसून येते.

या वाढदिवसानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना की, त्यांना उत्तम आरोग्य, भरभराट आणि अखंड यश लाभो. त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश मिळत राहो आणि त्यांनी अशीच प्रगतीची नवी शिखरे गाठत राहावीत, हीच सदिच्छा!पुन्हा एकदा आदरणीय तेजस दादा ओझरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

पत्रकार अली मुजावर, मीडिया सेवेन 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket