अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » कार्यकर्त्यांच्या मनाचा मान राखणारे नेते! मंत्री जयकुमार गोरे मध्यरात्री पोहोचले ओंध येथील वास्तुशांती सोहळ्यास

कार्यकर्त्यांच्या मनाचा मान राखणारे नेते! मंत्री जयकुमार गोरे मध्यरात्री पोहोचले ओंध येथील वास्तुशांती सोहळ्यास

कार्यकर्त्यांच्या मनाचा मान राखणारे नेते! मंत्री जयकुमार गोरे मध्यरात्री पोहोचले ओंध येथील वास्तुशांती सोहळ्यास

औंध : राजकारण म्हणजे केवळ सभा, बैठका आणि भाषणे नसतात, तर कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचे मन जपणे, त्यांचा मान राखणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. हीच बाब राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिली. शुक्रवारी, दि. २४ एप्रिल रोजी औंध येथील वसंत पवार आणि कुटुंबीयांच्या नवीन वास्तूच्या वास्तुशांती सोहळ्यास त्यांनी मध्यरात्री १२ वाजता उपस्थित राहून कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांच्या आनंदात भर घातली. दि. २४ रोजी दिवसभर शासकीय कार्यक्रम, बैठका आणि दौऱ्यांमध्ये व्यस्त असतानाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पाळत मध्यरात्री औंध येथे हजेरी लावली.

रात्री उशिराची वेळ असूनही त्यांच्या आगमनाची उत्सुकता कार्यकर्ते “सुखदुःखात कायम साथ देणारा, कार्यकर्त्यांच्या भावनांची जाण ठेवणारा आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारा आमचा नेता म्हणजे जयकुमार गोरे. मध्यरात्री येऊन त्यांनी आमच्या कुटुंबाचा सन्मान वाढविला. हा क्षण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.”

– वसंत पवार (मेजर), औंध.

रात्री उशिराची वेळ असूनही त्यांच्या आगमनाची उत्सुकता कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये दिसून येत होती. मंत्री गोरे कार्यक्रमस्थळी पोहोचताच जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात वातावरण भारावून गेले. पवार कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. ग्रामविकास मंत्री गोरे यांनी नव्या वास्तूची पाहणी करत कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेतला आणि लहानग्यांशीही प्रेमाने संवाद साधला. त्यांच्या या साधेपणाने आणि आपुलकीने उपस्थित सर्वांची मने जिंकली. कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते यावेळी पुन्हा अधोरेखित झाले.

कोणत्याही पदाचा गर्व न बाळगता, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी सहभागी होणारे नेतृत्व म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते. मध्यरात्रीची ही भेट त्याच नात्याला अधिक दृढ करणारी ठरली. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या आगमनाने पवार कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

उपस्थित ग्रामस्थांनीही त्यांच्या या आत्मीयतेचे कौतुक केले. “नेता असावा तर असा,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पवार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री गोरे यांच्या या अनपेक्षित पण हृदयस्पर्शी भेटीची चर्चा औंध परिसरात दिवसभर रंगत होती. या सोहळ्यासाठी माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर, सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनियाताई गोरे, उर्मिलाताई येळगावकर, वर्धनचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम आदीसह खटाव तालुक्यातील विविध मान्यवरांनी भेट दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket