अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » महाबळेश्वरात शाळांमध्ये अभियोग्यता चाचणी, मुदत ठेवींसाठी निविदा व पथविक्रेता धोरणाची मागणी

महाबळेश्वरात शाळांमध्ये अभियोग्यता चाचणी, मुदत ठेवींसाठी निविदा व पथविक्रेता धोरणाची मागणी

महाबळेश्वरात शाळांमध्ये अभियोग्यता चाचणी, मुदत ठेवींसाठी निविदा व पथविक्रेता धोरणाची मागणी

महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कारभारात शैक्षणिक गुणवत्तावाढ, आर्थिक पारदर्शकता आणि फेरीवाल्यांचे नियमन यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेवक मिलिंद ढेबे यांनी नगराध्यक्षांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभियोग्यता चाचणी (Aptitude Test) घेण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता, बौद्धिक पातळी आणि आवडी-निवडी ओळखता येणार असून, योग्य करिअर निवडीसाठी त्यांना दिशा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यटनप्रधान भागात शिक्षणाबरोबरच व्यवसायालाही महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांचा कल ओळखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर नगरपरिषदेच्या मुदत ठेवी (Fixed Deposit) निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. विविध बँकांकडून स्पर्धात्मक व्याजदर मागवून जास्त परतावा देणाऱ्या बँकेत गुंतवणूक केल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक शिस्त राखण्यास मदत होईल, असा मुद्दा त्यांनी मांडला.

तसेच महाबळेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीत पथविक्रेता धोरण तातडीने जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४’ अंतर्गत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण, ओळखपत्र, सामाजिक सुरक्षा आणि तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket