महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट

सातारा जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांची मातृसंस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा वर्धापन दिन १७ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेणेत आला.तसेच शतक महोत्सवी वाटचालीत सातत्याने होत असलेल्या प्रगतीबद्दल अनेक मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. बँकेच्या आजवरच्या वाटचालीत विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक सदस्य ,सभासद बंधू भगिणी आणि कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करणेत आले. तसेच सर्व कर्मचा-यांनी एकदिलाने बँकेच्या उज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला.

यावेळी डॉ. सौ.प्रियाताई शिंदे यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिक बळ मिळत असलेचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध योजनाबद्दल समाधान व्यक्त करून बँकेने भविष्यातही नाविण्यपूर्ण योजना राबवाव्यात असे आवाहन केले. तसेच बँकेस वसुलीकामी जिल्हा परिषद मार्फत भरीव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बँकेचे चेअरमन श्री. विजय ढमाळ यांनी सभासदांच्या हितासाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली.तसेच सभासद,खातेदार यांना विनम्र व तप्तर सेवा देण्यासाठी बँक नेहमीच कटीबद्ध असलेचे सांगितले.

वर्धापन दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ संपर्क प्रमुख मा. श्री. सिध्देश्वर पुस्तके, जि.प. सदस्य श्री. अजित साळुंखे, श्री महेंद्र जानुगडे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ तसेच बँकेचे व्हा. चेअरमन नितीन फरांदे यांचे समवेत संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, सौ पुष्पलता बोबडे, सौ. निशा मुळीक, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव शहाजी खाडे, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे, श्री किरण फाळके अध्यक्ष कोरेगाव तालुका शिक्षक समिती, सभासद श्री गणेश लोखंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आण्णासाहेब भोसले, सर्व अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

बँकेच्या प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक सभासद व ठेवीदार, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket