अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार

पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 

पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 

पाचगणी प्रतिनिधी -पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील गोडवली पो. खिंगर ता. महाबळेश्वर जि. सातारा येथील रहिवाशी भरत तुकाराम मालुसरे याच्याविरूध्द यापुर्वी पाचगणी पोलीस ठाणेस शरीराविरूध्द व मालाविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वर्तनामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त होवुन दहशत व भितीच्या छायेत आपले दैनंदिन जिवन व्यथित करीत होते.

त्यामुळे परिसरातील लोकांना हद्दपार इसमाच्या दहशतीतुन मुक्त करण्यासाठी व सर्वसामान्य नागरीकांचे दैनंदिन जिवन सुरळीत विनाविघ्न व आनंदमय चालावे याकरीता तसा हद्दपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सोो, सातारा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव मा.उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी पडताळणी करून, साक्षीदार व्हेरीफाय करून मा.उप विभागीय दंडाधिकारी सोो, वाई विभाग वाई यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याप्रमाणे मा.उप विभागीय दंडाधिकारी श्री. योगेश खरमाटे यांनी त्यांच्याकडील आदेश क्रमांक एमएजी/हद्दपार/एसआर ०६/२०२५ वाई दि.१०.०४.२०२६ अन्वये सदर प्रकरणी भरत तुकाराम मालुसरे रा. गोडवली पो. खिंगर ता. महाबळेश्वर जि. सातारा यास २ वर्षाकरीता सातारा जिल्हयातुन तडीपार करण्यात आले असल्याचा आदेश पारीत केला आहे.

पाचगणी पोलीस ठाणे मार्फत करण्यात आलेल्या सदर हद्दपारीच्या ठोस कारवाईमुळे स्थानिक नागरीकांमधुन समाधान व्यक्त होत आहे. तसेच अजुन काही सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या इसमावरती हद्दपार प्रस्ताव कारवाई प्रस्तावित आहे. नागरीकांनी निसंकोचपणे तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल साळुंखे सोो, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पाचगणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक, पो. हवालदार श्रीकांत कांबळे ब.क.१२८३ यांनी कामकाज पाहिले आहे. सदर चांगल्या कामगिरीबाबत संपुर्ण टिमचे मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी सोो, यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket