भीमशाही युवा क्रांती संघटनेचा अनोखा उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
केळघर(प्रतिनिधी)- आपल्या अनोख्या उपक्रमांनी ओळखली जाणारी भीमशाही युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या जावळी शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
या साठी जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील दुद मुरा,कुसुम्बी मुरा,मोळेश्वर,सह्याद्री नगर ,ढेबे वस्ती,शिंदे वस्ती,चिकनवाडी,तेटली मुरा,मांटी मुरा,भवानीनगर,गोंदेमाळ या गावातील शाळेना भेट देत शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी भीमशाही युवा क्रांती संघटना चे अध्यक्ष सुहास चव्हाण (आमन), खजिनदार प्रकाश गाडे,उपाध्यक्ष प्रजित गायकवाड,सचिन,कांबळे,राज गाडे,निखिल गाडे, सौरभ गाडे व समीर गाडे,करण धनावडे,पत्रकार मोहन खुडे,पत्रकार सूर्यकांत जाधव हे उपस्थित होते या साठी वरील शाळेचे शिक्षक तसेच ग्रामस्थ यांची मोलाची साथ लाभली संघटनेच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून शालेय साहित्य वाटप केलेल्या गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




