सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » ठळक बातम्या » कराड पोलिसांचा जबरदस्त धडाका; आंतरराज्य घरफोड्या टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद, १५.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड पोलिसांचा जबरदस्त धडाका; आंतरराज्य घरफोड्या टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद, १५.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड पोलिसांचा जबरदस्त धडाका; आंतरराज्य घरफोड्या टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद, १५.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड (ज्ञानेश्वर शेवाळे )कराड शहर पोलिसांनी एप्रिल २०२६ मध्ये घडलेल्या घरफोडीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावत आंतरराज्य स्तरावर गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून मोठे यश संपादन केले आहे.मलकापूर व सैदापूर परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाला गती दिली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आरोपीचा माग काढला. या तपासातून लक्ष्मण रावसाहेब सुतार (रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) याला अटक करण्यात आली. सदर आरोपीवर सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे २० घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्दे :

मलकापूर व सैदापूर येथील घरफोडीचे गुन्हे उघड

 लक्ष्मण रावसाहेब सुतार अटकेत आंतरराज्य स्तरावर गुन्हे करणारा सराईत आरोपी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासामुळे पोलिसांना यश  सोने-चांदीचे दागिने व चारचाकी वाहन जप्त

 एकूण ₹१५,२२,५०० मुद्देमाल हस्तगत

आरोपीकडून चोरीतील सोने-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण १५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या सहकार्याने पो.उ.नि. निखील मगदूम व त्यांच्या पथकातील सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, सोनाली पिसाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या कारवाईमुळे कराड शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket