सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » साताऱ्यात बालकांसाठी ‘अभिनय कार्यशाळे’चे आयोजन

साताऱ्यात बालकांसाठी ‘अभिनय कार्यशाळे’चे आयोजन

साताऱ्यात बालकांसाठी ‘अभिनय कार्यशाळे’चे आयोजन

सातारा : मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी साताऱ्यातील हिंदवी पब्लिक स्कूलच्या हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल प्रकल्पांतर्गत विशेष ‘बालनाट्य अभिनय कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

प्रसिद्ध प्रशिक्षक संजय हळदीकर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. श्री. हळदीकर यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि राज्याबाहेर २००० हून अधिक अभिनय कार्यशाळांच्या माध्यमातून अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

या सहा दिवसांच्या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात प्रामुख्याने स्टेज डेअरिंग आणि संभाषणकला, स्मरणशक्ती आणि निरीक्षण कौशल्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवणे, स्टोरी बिल्डिंग आणि नाट्यछटा, सांघिकता आणि कल्पनाशक्तीचा विकास होणार आहे.

 हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये ८ ते १५ वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी ही कार्यशाळा दोन सत्रांत होईल. (पहिली बॅच: सकाळी १० ते १, दुसरी बॅच: दुपारी २ ते ५). प्रवेश मर्यादित असून’प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केवळ ४० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी १८ एप्रिलपूर्वी करणे आवश्यक आहे. शिबिराच्या समारोपाच्या दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या पालकांसमोर कला सादरीकरण करणार आहेत.

अधिक माहिती व नोंदणीसाठी ८००७८१००११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket