अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » धार्मिक » प्रतापगडाच्या पायथ्याशी भक्तीचा जागर! श्री क्षेत्र पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव १४ एप्रिलपासून

प्रतापगडाच्या पायथ्याशी भक्तीचा जागर! श्री क्षेत्र पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव १४ एप्रिलपासून

प्रतापगडाच्या पायथ्याशी भक्तीचा जागर! श्री क्षेत्र पार येथे श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव १४ एप्रिलपासून

महाबळेश्वर (प्रतिनिधी):सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा आणि ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याच्या सानिध्यात वसलेल्या श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार)येथील आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव यंदा १४ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

 समर्थ रामदास स्वामींचे कुलदैवत आणि प्रभू श्रीरामांना वर देणारी माता म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक येण्याची शक्यता वर्तवन्यात येत अहे.

  चैत्र कृष्ण द्वादशीपासून सुरू होणारा हा महोत्सव वैशाख शुद्ध षष्ठीपर्यंत चालणार असून, या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

 १४ एप्रिल२०२६ (मंगळवार)यात्रेचा  प्रारंभ देवीच्या अभिषेकाने होईल. सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल, तर रात्री गावातून मातेची पालखी आणि काठी मिरवणूक काढली जाईल.

 १५ एप्रिल (बुधवार):रात्री ९ वाजता परिसरातील ४३ गावांतील देवांचे विडे वर्तविण्याचा पारंपरिक सोहळा आणि देवदेवतांचे आगमन होईल.

१६ एप्रिल (गुरुवार): यात्रेचा मुख्य दिवस. रात्री ११ वाजता यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले ‘बगाड’ पार पडेल. त्यानंतर रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशाच्या प्रयोगाने मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

 १७ ते २० एप्रिल: दररोज सकाळी श्रींची आरती आणि रात्री करंड ढोल-लेझीमच्या गजरात देवीची आरती व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

 १९ एप्रिल (रविवार):विशेषत: महिला भाविकांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘छबिना’ उत्सवाने होणार यात्रेचा समारोप

या यात्रेची सांगता वैशाख शुद्ध पंचमीला म्हणजेच २२ एप्रिल रोजी होईल. या दिवशी ‘छबिना’ उत्सव, होमहवन, लघुरुद्र अभिषेक आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा

श्रीरामवरदायिनी मातेचे मंदिर महाबळेश्वरपासून २० किमी आणि प्रतापगडाच्या दक्षिणेस ३ किमी अंतरावर घनदाट जंगलात वसलेले आहे. या स्थानाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे: समर्थांची श्रद्धा: समर्थ रामदास स्वामींनी या देवीचे वर्णन ‘रामवरदायिनी’ असे केले आहे.

रामायणातील संदर्भ: प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी याच ठिकाणी देवीची उपासना केली होती, अशी पुरातन आख्यायिका आहे.

आवाहन

देवस्थान विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळ, पार यांच्या वतीने या मंगल उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket