अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लायन्स क्लब कॅबिनेट ऑफिसर युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार

लायन्स क्लब कॅबिनेट ऑफिसर युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार

लायन्स क्लब कॅबिनेट ऑफिसर युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये प्रभावी योगदानाची दखल

कराड प्रतिनिधी – लायन्स क्लबच्या कॅबिनेट ऑफिसर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आणि युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना फलटण येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी लायन्स क्लबच्या विविध विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय सभापती MJF लायन नीलम पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देताना त्यांनी विद्या मोरे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले आणि क्लबच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रचारासाठी त्यांचे विशेष योगदान मान्य केले

झोन चेअरमन मंजिरी खुस्पे यांनी ही त्यांच्या कार्याचे कौतुक केले .विद्या मोरे यांनी लायन्स सोशल उपक्रमांमध्ये उत्कृष्ट (पीआरओ) चे कार्य करत संस्थेची प्रतिमा मजबूत केली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उपक्रमांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर अधिक ओळख मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमात विद्या मोरे यांचे यश साजरे करत उपस्थितांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराने पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाला मान्यता मिळाल्याचे ठळक उदाहरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी असेही नमूद केले की, विद्या मोरे यांचे कार्य युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे आणि लायन्स क्लबच्या उद्दिष्टांची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठे योगदान ठरते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket