अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » आंबेघर सोसायटीने साधली १००% कर्जवसुली; रांजणे यांचे कौतुक

आंबेघर सोसायटीने साधली १००% कर्जवसुली; रांजणे यांचे कौतुक

आंबेघर सोसायटीने साधली १००% कर्जवसुली; रांजणे यांचे कौतुक

मेढा प्रतिनिधी -जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका असला तरी विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पीककर्ज मुदतीत भरण्यासाठी शेतकरी   प्रयत्न करतात. त्यामुळे दुर्गम जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असून सोसायट्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले. बँक पातळीवर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झालेल्या आंबेघर येथील आशिलमाल  विकास सेवा  सोसायटी च्या संचालक मंडळांचा सत्कार आज येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत करण्यात आला. त्यावेळी रांजणे बोलत होते.

यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम, विकास अधिकारी ए. बी. खटावकर, वसुली आधिकारी संजय निकम, केळघर शाखा प्रमुख सूर्यकांत चिकणे, आंबेघर सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ शेलार, उपाध्यक्ष सुरेश शेलार, मोहनराव कासुर्डे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, केळघर सोसायटीचे सचिव आनंदा शेलार, आंबेघर चे सचिव विठ्ठल शेलार, वरोशीचे सचिव दिपक शेलार , संचालक अर्जुन जाधव,सुभाष शेलार, नामदेव शेलार , शामराव शेलार , राजाराम भिलारे , संपत शेलार , ज्ञानदेव शेलार, सिताराम कांबळे, जयश्री शेलार , हिराबाई शेलार , कोंडीबा कासुर्डे,महादेव राजगे, भगवान राजगे, जगन्नाथ शेलार , साहेबराव शेलार , प्रदीप कासुर्डे, ,तेजस कासुर्डे, अक्षय पवार ,संतोष शिर्के आदींची उपस्थिती होती.

यावेळी रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यातील बिभवी, ओझरे, मामुर्डी, आंबेघर, गांजे, करंदी तर्फे कुडाळ, या सोसायट्या ची बँक पातळीवरील कर्ज वसुली १०० टक्के झाली असून तालुक्यातील इतर सोसायट्यांनी या संस्थांचा आदर्श घेऊन शंभर टक्के कर्ज वसुली करावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

यावेळी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ शेलार यांनी सांगितले २१० सभासद असलेल्या या संस्थेने पहिल्याच वर्षी १ कोटी ५३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करून शंभर टक्के वसुली केली आहे . यावेळी सोसायटी चे सभासद, शेतकरी उपस्थित होते.यावेळी शंभर टक्के कर्जवसुली केलेल्या आंबेघर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा  सत्कार रांजणे यांच्या हस्ते करण्यात आला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket