मेटगुताड येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्याचे भव्य आयोजन
महाबळेश्वर:तालुक्यातील मेटगुताड येथे ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान मंडळ यांच्या वतीने श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक उत्सव बुधवार, १ एप्रिल २०२६ आणि गुरुवार, २ एप्रिल २०२६ (चैत्र शु. पौर्णिमा, शके १९४८) या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे.
दोन दिवसांच्या कार्यक्रमाची रूपरेषा
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
बुधवार, दि. १ एप्रिल २०२६: दुपारी २:०० वा.: क्षेत्र महाबळेश्वर येथे कलश अभिषेक. दुपारी ४:०० वा.: कलशाची वाजत-गाजत ग्रामप्रदक्षिणा.सायंकाळी ७:०० वा.: कलश धान्याधिवास विधी. रात्री ८:०० नंतर: मेटगुताड ग्रामस्थ भजनी मंडळाचा सुस्वर भजनांचा कार्यक्रम.गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ (मुख्य सोहळा)सकाळी ७:०० ते ९:००: संकल्प गणपती पूजन, पुण्याहवाचन, मूर्ती जलाधिवास अभिषेक आणि होम हवन.
सकाळी ११:०० वा.: वेदाचार्य श्री खरे काका (वाई) यांच्या हस्ते मूर्ती स्थापना व सत्यनारायण महापूजा.
दुपारी १२:०० वा.: श्री मंगलगीरी महाराज यांच्या हस्ते मंदिरावर सुवर्ण कलशारोहण संपन्न होईल.
दुपारी १२:३० वा.: ह.भ.प. प्रविणमहाराज शेलार (संस्थापक, गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, आंबेघर) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. या कीर्तनाला महाबळेश्वर तालुका वारकरी संघटना व युवा वारकरी संघटना साथ देणार आहेत. दुपारी २:३० वा.: भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.“भिमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती…” अशा स्तोत्र पठणाने आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे.
मेटगुताड येथील ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान मंडळाने सर्व भाविकांना या मंगलप्रसंगी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थळ: मेटगुताड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा.
निमंत्रक: ग्रामस्थ मंडळ मेटगुताड व जय हनुमान मंडळ मेटगुताड.




