सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » प्रशासकीय » कराड येथील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा नगरपालिकेची धडक मोहीम सुरू; स्टॅन्ड परिसराने घेतला मोकळा श्वास

कराड येथील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा नगरपालिकेची धडक मोहीम सुरू; स्टॅन्ड परिसराने घेतला मोकळा श्वास 

कराड येथील अतिक्रमणांवर नगरपालिकेचा हातोडा नगरपालिकेची धडक मोहीम सुरू; स्टॅन्ड परिसराने घेतला मोकळा श्वास 

कराड प्रतिनिधी- कराड नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत टपऱ्या तसेच इतर अतिक्रमणे हटविण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. विशेषतः कराड स्टँड परिसरासह मुख्य रस्ते आणि विविध पेठांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कृष्णा नाक्यापासून सुरू झालेले अतिक्रमणाची मोहीम भेदा चौक, कोल्हापूर नाक्यापर्यंत आणि ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी दिली .

या कारवाईत नगरपालिका प्रशासनासोबत पोलीस प्रशासनानेही सक्रिय सहभाग घेतला असून अतिक्रमणे शांततेत काढण्याचे काम सुरु आहे. दीर्घकाळापासून रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते नुकताच गेल्या आठवड्यात प्राध्यापक महिलेचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू यामध्ये झाला यामुळे या अपघाताच्या बाबतीत विविध संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिक्रमण विरोधात आवाज उठवला त्याच अनुषंगाने नगरपालिकेने तातडीचे बैठक घेऊन अतिक्रमणे काढण्यासंदर्भात तातडीने पाऊल उचलले अतिक्रमणामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती.

दरम्यान, ही कारवाई सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपालिका प्रशासनाने ही मोहीम पुढेही सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket