अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा– ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा : सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाचे काही ठिकाणी अर्धवट काम राहिले आहे. यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. ही गंभीर बाबा असून रस्ते विकास महामंडळाने अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावेत, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा ते लातूर व सातारा ते पंढरपूर महामार्गाविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे धुळदेव ता. माण येथील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणत या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशा सूचना करुन ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, दिवड हद्दीत पुलाचे काम अर्धवट असून काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्त्यावर डांबरीकरण करावे. मौजे पळशी येथील 50 मिटर रस्ता अर्धवट असून या ठिकाणी डांबरीकरण करावे. 

मौजे गोंदवले ब्रु. येथील ब्रम्हचैतन्य मंदिर ते शेतकरी भवन या ठिकाणी नियमापेक्षा उंच गतीरोधक केले आहेत ते काढून शासकीय निकषा प्रमाणे गतीरोधक तयार करावा. चिमणगाव ता. कोरेगाव येथील 30 मीटर रस्ता अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण करावा. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मौजे पिलीव ते पंढरपूर या रस्त्याच्या अर्धवट कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करावे, असे निर्देशही ग्रामविकास मंत्री श्री.गोरे यांनी दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket