सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन

सातारा – मिशन लक्ष्यवेध योजनेच्या माध्यमातून ऑलम्पिंक स्तरावर खेळल्या जाणा-या खेळ प्रकारामध्ये लक्ष्य केंद्रीत करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय पर फॉर्मंस सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तराव क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत कुस्ती, मैदानी, हॉकी, धनुर्विद्या, शूटींग अशा एकूण पाच क्रिडा प्रकारामधून प्रत्येक 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

या निवड चाचणीकरीता सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी कागदपत्रांसह 15 एप्रिल 2026 पर्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे प्रत्यक्ष अथवा sataradso@gmail.com, dsosatar@yahoo.co.in या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.  

 या निवडचाचणीसाठी पुढील निकषास खेळाडूनी पात्र असावे. खेळाडू हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याचे वय त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी 21 वर्षाआतील असावे. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, गत दोन वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोटसाईज 3 फोटो, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.

खेळाडूंची निवड ही तज्ञ समितीकडून करण्यात येणार असून आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, प्रवासखर्च, मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा, व प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च योजनेमधून केला जाणार असल्याची माहितीही श्री. तारळकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket