सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. किरण पाटील यांचा प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. किरण पाटील यांचा प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री. किरण पाटील यांचा प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने गौरव

सातारा -शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सक्सेस ॲबॅकस संस्थेचे चेअरमन श्री. किरण पाटील यांना “प्राइड ऑफ महाराष्ट्र” हा प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा पुणे येथे अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुद्रा व जलसंधारण मंत्रालयाचे सचिव माननीय सुनील चव्हाण (IAS) यांच्या शुभहस्ते श्री. किरण पाटील यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम ग्रीन वर्ल्ड या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या पुरस्कार समारंभाला राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक होते. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला, मात्र शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्यामुळे श्री. किरण पाटील यांचा सन्मान विशेष ठरला.

सक्सेस ॲबॅकस या संस्थेच्या माध्यमातून गेली १२ वर्ष किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची भीती दूर करण्याचे अत्यंत प्रभावी कार्य केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना गणित हा कठीण विषय वाटत असताना, त्यांनी ॲबॅकस आणि वेदिक गणिताच्या माध्यमातून गणित शिकण्याची पद्धत सोपी, रंजक आणि आनंददायी बनवली आहे. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ गणितीय कौशल्येच नव्हे, तर एकाग्रता, स्मरणशक्ती, वेगवान विचार करण्याची क्षमता आणि विश्लेषणात्मक दृष्टीकोन मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. संपूर्ण ॲबॅकस अभ्यासक्रम केवळ ४ लेव्हल मध्ये उपलब्ध करून ॲबॅकस अध्यापणात क्रांतिकारक पाऊल टाकण्याचे काम सक्सेस ॲबॅकस या संस्थेने किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली 500 पेक्षा अधिक शाखा काम करत आहेत तसेच 50,000 पेक्षा अधिक विद्यार्थी घडले आहेत 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणारे अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे. विशेषतः लहान वयातील मुलांच्या बौद्धिक विकासावर भर देऊन त्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्याचे त्यांचे ध्येय स्पष्टपणे दिसून येते.

या सन्मानाबद्दल आपली भावना व्यक्त करताना श्री. किरण पाटील म्हणाले,“हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा सन्मान केवळ माझा नसून सक्सेस ॲबॅकसच्या संपूर्ण टीमचा, माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आहे. त्यांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच मी हे कार्य यशस्वीपणे करू शकलो. या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने आणि उत्साहाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, येणाऱ्या काळातही त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुद्रा व जलसंधारण मंत्रालयाचे सचिव सुनील चव्हाण (IAS) यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्वीकारताना किरण पाटील सर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket